मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप

मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप लावणारा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत मंजूर झाला आहे. या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध केला होता. मात्र, हा मनसेचा हा प्रस्तावर बहुमताने मंजूर झाल्याने भाजपला दणका मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Updated: Nov 27, 2014, 09:35 PM IST
मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप  title=

मुंबई : मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप लावणारा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत मंजूर झाला आहे. या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध केला होता. मात्र, हा मनसेचा हा प्रस्तावर बहुमताने मंजूर झाल्याने भाजपला दणका मिळाल्याचे म्हटले जात आहे.

ग्राहकांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असा भेदाभेद करणाऱ्या आणि मांसाहारी असल्यानं घरं नाकारणाऱ्या बिल्डरांना सीसी म्हणजे इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट आणि ओसी म्हणजे रहिवाशांना राहण्यासाठी इमारत तयार असल्याचं सर्टिफिकेट देऊ नये, असा प्रस्ताव मनसेनं मांडला होता. 

शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तर भाजपच्या नगरसेवकांनी मात्र त्याला विरोध केला. अखेर प्रचंड गदारोळात महापालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.