मुंबई : भाजपामध्ये समन्वयाचा आभाव असल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.
शिवसेना नेत्यांनी आज अनिल देसाई यांच्यासह वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना सकारात्मक असल्याचं सांगतानाच आता मात्र विस्तार लांबला असल्याचंही स्पष्ट केलं.
आज शिवसेना-भाजपा समन्वयाची बैठक होणार होती. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले नसल्यानं बैठक होऊ शकली नाही. शिवसेनेत कुठल्याही प्रकारची गडबाजी किंवा सत्तासंघर्ष नसल्याचं देसाई यावेळी सांगितले.
दरम्यान, याआधीही देसाई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबात भाष्य केले होते. भाजपमुळेच विस्तारा दिरंगाई होत असल्याचे म्हटले होते. आज पुन्हा भाजपला दोष देत त्यांच्यात समन्वय नसल्याचे सांगून भाजपला डिवचलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.