मुंबई : मनी लॉ़ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांचा जेलमधला मुक्काम वाढला आहे. भुजबळांचा जामीन अर्ज विशेष ईडी न्यायालयानं फेटाळला. भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांची तुरूंगावासातून सुटका होण्याची आशा मावळली आहे.
पुराव्यांमध्ये छेडछाड केली जाण्याच्या शक्येतने न्यायालयानं हा जामीन फेटाळलाय.. भुजबळ सध्या अटकेत आहेत. १५ मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.
भुजबळ काका-पुतणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. छगन भुजबळ यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने भुजबळ यांना जामीन देणे शक्य नसल्याचे सांगत याचिका फेटाळून लावली आहे.