मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांचे चार्टर्ड आकाऊंटंट सुनील नाईक याला ईडीनं अटक केली. नाईक यांनीच भुजबळांबाबत माहिती दिल्याचे बोलले जात आहे.
न्यायालयानं या प्रकरणी ३० जणांच्या विरोधात नुकतंच अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. ईडीमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ परिवाराविरोधात कारवाई सुरु होण्याआधीच सुनीलला ईडीनं आपल्या गळाला लावलं होतं. माफीचा साक्षीदार बनवण्याच्या अटीवर त्यानंच ईडीला सर्व माहिती पुरवल्याचं समजतंय.
आता सुनीलची औपचारिक अटक दाखवून नंतर त्याला जामीन दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समीर भुजबळ संचालक असलेल्या ६४ कंपन्यांमार्फत जवळपास ८७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं आरोपपत्रात केला आहे.