एकच आरोप करा, पण तगडा करा : मुख्यमंत्री

 राज्य सरकारमधील मंत्र्यांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Updated: Jul 23, 2016, 11:09 AM IST
एकच आरोप करा, पण तगडा करा : मुख्यमंत्री title=

मुंबई :  राज्य सरकारमधील मंत्र्यांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विरोधक माध्यमांमधून चुकीचे आरोप लावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षांनी २० मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत सर्वच मंत्र्यांना क्लीनचीट दिली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून मंत्र्यांवर केलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले. एकच आरोप करा, पण तगडा करा. हवेत बाण मारण्यापेक्षा पुराव्यासह आरोप करा , असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

राज्य सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. सरकार विरोधी पक्षाला सभागृहात बोलू देत नाही. बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.