मुंबईला अच्छे दिन येणार? विरोधाचं राजकारण आणि विकास!

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या समितीमध्ये खासदार आणि महापालिकेच्या घटकांचा समावेश असावा, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय. 

Updated: Dec 8, 2014, 11:36 PM IST
मुंबईला अच्छे दिन येणार? विरोधाचं राजकारण आणि विकास! title=

मुंबई: मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या समितीमध्ये खासदार आणि महापालिकेच्या घटकांचा समावेश असावा, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय. 

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती असल्यास मुंबईचा विकास होईल. मात्र या विकासामुळं भाजपला फायदा होईल या भीतीपोटी विरोधक या मागणीचा विरोध करत असल्याचं भाजप आमदार पराग अळवणी यांनी म्हटलंय.

मुंबईचं शांघाय करु... ही आता अफवा झालीय... पण केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आल्यावर मुंबईला अच्छे दिन येणार का... याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईच्या विकासासाठी साकडं घातलंय. कुठलीही योजना किंवा निर्णय असो, त्याचं विरोधाचं राजकारण हे होणारच.

मुंबईचे अनेक प्रकल्प गेली अनेक वर्षं मंजुरीसाठी रखडलेत

> शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लाईन

> सीएसटी पनवेल समुद्र मार्ग

> बीपीटी जमिनीचा विकास

> बीडीडी चाळ विकास

> सी लिंक फेज टू

> नवी मुंबई विमानतळ

हे प्रकल्प प्राधान्यानं मार्गी लागण्याची गरज आहे. मुंबईच्या विकासासंबंधीचे प्रकल्प केंद्राशी निगडीत असल्यानं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणं हा चांगला निर्णय असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. 

मुंबईचा विकास म्हणजेच पर्यायानं देशाचा विकास, हे मोदी चांगलंच ओळखून आहेत. त्यामुळं मुंबईवरुन राजकारण करण्यापेक्षा विकासाचीच भाषा बोलायला हवी.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.