मुंबई: मुंबईतील हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेनं टाकलेली बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली आहे. धुम्रपानावर बंदी नसेल तर हुक्का पार्लरवर बंदी कशाला हवी, असा सवालही सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत हुक्का पार्लर चांगलेच फोफावले असून दम मारो दम म्हणत हुक्का मारणाऱ्या तरुणाईचं प्रमाणही वाढलं होतं. हुक्क्याच्या व्यसनाधीन झालेल्या मुलांमुळं पालकांची डोकेदुखी वाढली होती.
तीन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेनं रेस्टॉरंटमध्ये हुक्का उपलब्ध करुन देण्यास बंदी टाकली होती. या निर्णयाविरोधात मुंबईतील हुक्का पार्लर मालकांनी कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानं मुंबई महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टानं स्मोकिंग झोन असलेल्या रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालवण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.