www.24taas.com, मुंबई
गेल्या ७८ दिवसांपासून संपावर गेलेल्या प्राध्यापकांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फटकारलयं. संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठिस धरु नका अन्यथा कठोर कारवाई करु असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. प्राध्यापकांच्या संपामुळं महाविद्यालयीन परीक्षांचा खेळखंडोबा झालाय.
या संपाचा परिणाम परीक्षांच्या निकालावरही होण्य़ाची शक्यता आहे. सरकारनं संपक-यांच्या काही अटी मान्य केल्यात मात्र प्राध्यापक लेखी अटींवर अडून बसल्यानं संप आणखीनंच चिघळलाय.
दुष्काळग्रस्त जिल्हा बँकांना बँकिंग परवाना/B>
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आर्थिक मदत केलेल्या जालना आणि धुळे नंदूरबार जिल्हा बँकाना बँकिंग परवाना मिळणार आहे. त्यामुळं य़ा दोन जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतक-यांना कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. तर इतर बँकांच्या परवान्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलावली होती.