योजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता

आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.

Updated: Mar 13, 2013, 05:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही. अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
तसे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. एलपीजी गॅस, शिष्यवृत्तीसह अनेक योजनांचा फायदा हा आधार कार्ड नसलेल्यांना सुद्धा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं आहे.
सरकारी योजनांचा फायदा मिळवा म्हणून आधारकार्डसाठी राज्यात अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. आधार कार्ड नसेल तर फायदा मिळणार नसल्याच्या भीतीने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.