मुख्यमंत्र्यांकडून खडसेंच्या निर्णयाला दणका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खडसेंच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे. कारण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदावरून पाय उतार होताना, ११० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखून खडसेंच्या निर्णयाला दणका दिला आहे.

Updated: Jun 9, 2016, 09:50 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून खडसेंच्या निर्णयाला दणका title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खडसेंच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे. कारण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदावरून पाय उतार होताना, ११० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखून खडसेंच्या निर्णयाला दणका दिला आहे.

भोसरी येथील भूखंड प्रकरण, डॉन दाऊदला कथित कॉल केल्याचे प्रकरण, जावयाची लिमोझीन कार प्रकरण आणि कथीत पीए गजाजन पाटील लाच प्रकरणी  खडसे यांना अखेर  आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

मात्र खडसे यांनी या वादात घाईघाईने काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. जवळपास ११० उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्यांची फाईल खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या होत्या. 

एकनाथ खडसे यांनी उप-जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवल्या होत्या. या बदल्यांची फाईल फडणवीस यांनी परत संबंधित विभागाकडे पाठवल्या आहेत.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची शिफारस खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मात्र, प्रशासकीय बदलीच्या नियमानुसार नागरी सेवा मंडळाकडून मंजूर होऊन ही फाईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे येणे अपेक्षित होते. पण, महसूल विभागाने या नागरी सेवा मंडळाचे शेरे विचारात घेतले नाहीत. 

या नियमच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी या बदल्यांच्या फाईलींवर सही करण्यास नकार दिला. तसेच या फाईली नागरी सेवा मंडळाकडून तपासून पाठव्यात, असा शेरा मुख्यमंत्र्यांनी फाईलवर मारला आहे.