www.24taas.com, मुंबई
तुम्हाला माहित आहे का, हेरॉईन नावाच्या ड्रग्जचं नवं नाव सलाईन आहे. त्याचप्रमाणे कोकिन आता चार्लीऐवजी बामबा या नावानं परिचित झालय. हे खरय, पोलिसांना चकवा देण्यासाठी नशेच्या सौदागरांनी या नावांमध्ये बदल केलेत. नववर्षाच्या पार्टीलसाठी ड्रग्जला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसचं यावेळी असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेव्यवस्थेमुळे नशेच्या सौदागरांनी ही क्लुप्ती आजमावलीय.
दारुचे खळाळते पेग आणि जल्लोषाच्या रोषणाईत मुंबईत नववर्ष स्वागताची तयारी सुरु झालीय. या नव वर्षांच्या पार्ट्यांवर नशेच्या सौदागरांचीही नजर हे. या पार्टांमध्ये नशा चढवणा-या या ड्रग्जच्या विक्रीद्वारे ते कोट्यवधींचा धंडा करणार आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, डग्जचा हा व्यापार सुरु आहे, इतकचं नाही तर यासाठी ड्रग्जच्या कोड वर्डही बदलण्यात आलेत.
कोकिन ज्याला आत्तापर्यंत चार्ली या नावानं ओळखण्यात येत होतं, त्याचा कोड बदलून आता त्याचं नाव बामबा करण्यात आलय. हेरॉईनचं कोड नाव हिरा हे बदलून त्याचं नाव सलान करण्यात आलय. एम फएटामाईनचा नवा कोड वर्ड आहे कफ सिरप मथॉडॉनचा नवा कोड वर्ड आहे मैंडी. कोकिननंतर ज्या कोटांमाईन या नशिल्या औषधाचा वापर मुंबईत आणि इतर शहरांत सर्वाधिक होतो, त्याचा नवा कोड आहे कोरेक्स
नव वर्ष स्वागताच्या या काळात ड्रग्जच्या या व्यवहारात 40 टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या तीन महिन्यांत मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलय. तर गेल्या सहा महिन्यात मुंबई शहरात अमंली पदार्थ विरोधी शाखेनं 30 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलय. या आकडेवारीवरुन याची कल्पना ये शकेल.
मुंबई नशिली पदार्थांची मोठी बाजारपेठ बनलीय. मुंबई परिसरात अनेक ठिकाणी ड्रग्ज तयार करण्यात येत आणि त्याची विक्री देश आणि परदेशात करण्यात येतेय.