www.24taas.com,मुंबई
संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरीलीये. सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ७ अशांची घसरण झालीये. पुण्यामध्ये तर नोव्हेंबरमधील गेल्या १० वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झालीये. ७अंश सेल्सिअस इतक तापमान घसरलंय. तर मुंबईतही थंडीचा सुखद गारवा जाणवत आहे.
मुंबई-ठाण्यातही सकाळी गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी लोक बाहेर पडू लागल्याचं चित्र सध्या दिसतंय. उत्तरेकडील थंड तसेच कोरड्या वा-याचा परिणाम राज्यातल्या वातावरणावर होतोय. हवामानातील ही स्थिती किमान दोन दिवस कायम राहणार आहे.
नाशिकमध्येही पारा चांगलाच घसरलाय. नाशिकमध्ये ८.३ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीय. आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची ही नोंद आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यानं उबदार कपड्यांना मागणी वाढलीय.
येत्या काही दिवसात थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नाशिककर या थंडीचा आनंद घेतायत. अहमदनगरमध्येही ७.४ अंश सेल्सियन तापमानाची नोंद झालीये. तर जळगावमध्ये पारा ८.१ अंशावर आलाय. उर्वरित महाराष्ट्रातही थंडी जाणवू लागलीय.