31 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाचा संभ्रम कायम

31 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

Updated: Jan 8, 2017, 11:27 PM IST
31 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाचा संभ्रम कायम  title=

मुंबई : 31 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे आयोजकांनी हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं एक गट सांगतोय. तर दुसरीकडे एक गट मात्र मोर्चा ठरलेल्या तारखेला होणारच असं म्हणतोय.

महाराष्ट्रातील जिल्हावार मोर्चाच्या संयोजकांची बैठक 15 जानेवारीला दादर येथे आयोजीत करण्यात आली आहे. संयोजकांच्या बैठकीत मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.