मुंबईत कॉमन तिकिटिंग सिस्टीम

लंडनच्या धर्तीवर आता मुंबईतली कॉमन तिकीटिंग सिस्टीम लागू करण्याचा विचार आहे.... पाहुयात काय आहे ही सिस्टीम..... आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे.

Updated: Apr 10, 2015, 09:21 PM IST
मुंबईत कॉमन तिकिटिंग सिस्टीम  title=

कुमार कार्तिकेय,  झी मीडिया, मुंबई : लंडनच्या धर्तीवर आता मुंबईतली कॉमन तिकीटिंग सिस्टीम लागू करण्याचा विचार आहे.... पाहुयात काय आहे ही सिस्टीम..... आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे.

मुंबईत कुठेही प्रवास करायचा झाला, तरी रांगा लावा आणि तिकीट काढा, असा कारभार असतो....  पण आता हा त्रास वाचवण्यासाठी ट्रांसपोर्ट एजन्सीज सिंगल तिकिटिंग सिस्टम सुरू करण्याचा विचार करतायत. या सिंगल तिकिटिंग योजनेअंतर्गत  वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, बेस्ट, मेट्रो आणि मोनो या सगळ्यासाठी एकच तिकीट असणार आहे.... या योजनेमध्ये मुंबईसह, नवी मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक साधनांचाही समावेश करण्याचा विचार आहे. 

कॉमन तिकिटिंग सिस्टीमसाठी मुंबईतल्या सर्व वाहतूक साधनांशी संबंधित सगळ्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.  सिंगल तिकिटिंग सिस्टीमसाठी कॉमन IT प्लेटफॉर्म तयार करावा लागणार आहे, तसंच स्मार्ट कार्डही आणावं लागणार आहे.... हे स्मार्ट कार्ड एन्ट्री पॉईंटसच्या ठिकाणी स्वाईप करता येणार आहे. ग्राहकांना कार्डामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल. आणि रिचार्ज करावं लागेल. 

सध्या मुंबईत लोकल आणि बसेससाठी स्मार्टकार्ड उपलब्ध आहे.... तर मोनो आणि मेट्रोसाठी कुपन सिस्टीम आहे.... पण आता कॉमन तिकीटिंग सिस्टीम लागू झाली तर मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.