कापसाच्या भावात अचानक तेजी

मात्र ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना तो जास्त दिवस न ठेवता विकणे योग्य राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 28, 2016, 01:37 PM IST
कापसाच्या भावात अचानक तेजी title=

मुंबई : नोटबंदीचा काळ संपवण्यावर आला असताना कापसाच्या भावात तेजी आली आहे. प्रति क्विंटल 5 हजार रूपय असलेला कापूस आता, प्रति क्विंटला 5 हजार 500 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे.

कापसाच्या भावात आणखी काही तेजी येण्याची शक्यता आहे. मात्र कापसाचे भाव उशीरा वाढल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे, कारण फार कमी शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. 

मात्र ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना तो जास्त दिवस न ठेवता विकणे योग्य राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कापसाच्या गाठींची आयात लवकर सुरू केल्याने, कापसाच्या भावात वाढ झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. बांगलादेशने भारताकडून कापूस घेण्याच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले आहे.