मुंबईतले गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय समाजकंटक : शिवसेना

मुंबईतील गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय हा घटक सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असा आरोप केला होता. आता शिवसेनेने केल्याने वाद उद्धभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Updated: Apr 25, 2015, 05:14 PM IST
मुंबईतले गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय समाजकंटक : शिवसेना title=

मुंबई : मुंबईतील गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय हा घटक सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असा आरोप केला होता. आता शिवसेनेने केल्याने वाद उद्धभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परप्रांतातून आलेले समाजकंटक इथं धुमाकूळ घालत असल्याची टीका त्यांनी केली. वडाळ्यात बलात्कार झालेल्या चिमुरडीला भेटण्यासाठी त्या सायन हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची तब्येत आता सुधारत आहे, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

२२ एप्रिलला पाच वर्षांच्या लहानगीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणातल्या आरोपींचा पोलिसांना अजून ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.