www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होतेय.
या निवडणुकीतून धनंजय मुंडे यांनी काका आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना आव्हान दिलंय. या निवडणुकीत केवळ विधानसभेचे आमदार मतदान करणार असल्यानं धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र, सहजासहजी धनंजय मुंडेंना विजय मिळवू न देण्याचं गोपीनाथ मुंडे यांनी ठरवलंय. गोपीनाथ मुंडे जातीने या निवडणुकीत लक्ष घालताना दिसले. त्यामुळं मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणुकीत धनंजय मुंडे बाजी मारतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.