धूम-३ ते चेन्नई एक्स्प्रेसचा प्रवास फ्लॉप

गेल्या अकरा दिवसांपासून बेपत्ता झालेली अभिनेत्री अलका पुणेवार अखेर सापडलीय..... या अभिनेत्रीनं तिच्या प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन होता. त्यानंतर ते दोघे प्लॅस्टिक सर्जरीही करुन घेणार होते....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 8, 2014, 08:51 PM IST

www.24taas.com, अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई
गेल्या अकरा दिवसांपासून बेपत्ता झालेली अभिनेत्री अलका पुणेवार अखेर सापडलीय..... या अभिनेत्रीनं तिच्या प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन होता. त्यानंतर ते दोघे प्लॅस्टिक सर्जरीही करुन घेणार होते.... त्या दोघांना तयार केलेला प्लॅन चक्रावून टाकणारा होता.... पण एक सेंट न झालेल्या एसएमएसमुळे बिंग फुटलं....
अलका पुणेवार आणि तिचा प्रियकर आलोक पालीवाल या दोघांनीही लग्न करण्यासाठी एक भन्नाट प्लॅन आखला..... त्या प्लॅननुसार आधी अलकानं तिच्या नव-यापासून पळून जायचं आणि अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करायचा.....
प्लॅननुसार २७ डिसेंबरला अलका आणि आलोक दोघांनीही वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये धूम ३ सिनेमा पाहिला आणि दोघे सीएसटी स्टेशनला आले. तिथं आलोकनं त्याचा मित्र संजय सोलकरला बोलावून घेतलं. सीएसटी स्टेशनवरुन ट्रेननं अलका पुण्याला गेली.... काही दिवसांपूर्वी अलकानं एक गाडी घेतली होती. ती गाडी घेऊन संजय आणि आलोक खोपोली घाटात गेले आणि ती गाड़ी घाटात ढकलून दिली. त्यानंतर दोघेही पुण्याला निघून गेले. अलका आणि आलोक बसनं चेन्नईला निघून गेले..... इथे अलका गायब झाल्यानं संपूर्ण पोलीस यंत्रणा शोध घेऊ लागली..... इथपर्यंत सगळं काही ठरलेल्या प्लॅननुसार झालं..... पण एका सेंट न झालेल्या SMS नं बिंग फोडलं....
SMS मुळे उघड झाला बनाव
नव-याचं घर सोडण्याआधी अलकानं आलोकला कुठे भेटायचं, असा एसएमएस पाठवला होता.... पण आलोकनं त्याचा नंबर बंद केला होता त्यामुळे अलकाचा एसएमएस आलोकला सेंट झाला नाही. अलकानं मोबाईल आणि पर्स मुद्दामून गाडीत सोडली होती. पण गाडीत मोबाईल सोडणं त्यांना महाग पडलं. पोलिसांना मोबाईल आणि त्यातला सेंट न झालेला एसएमएस मिळताच तपासाची चक्रं वेगानं फिरु लागली. आलोकचा नंबर ट्रेस झाल्यावर आलोकनं कुणाकुणाला फोन केले, याचा शोध सुरू झाला आणि पुढे आलं संजय सोलकर य़ा आलोकच्या मित्राचं नाव....पोलिसांनी संजयला ताब्यात घेतलं आणि सगलं गूढ उलगडलं....
आलोक पालीवाल आणि अलका पुणेवार लग्न करुन नाव बदलून चेन्नईला स्थायिक होणार होते. इतकंच नव्हे तर ते प्लॅस्टिक सर्जरीही करुन घेणार होते.... पण एका सेंट न झालेल्या एसएमएसनं त्यांच्या प्लॅनचा फियास्को झाला.... टीव्ही सीरियल्समध्ये काम करत असल्यानं अलकाला हे ड्रामे कसे करायचे, हे चांगलंच माहीत होतं.... पण रिल लाईफचे ड्रामे रियल लाईफमध्ये चालत नाहीत, हे सिद्ध झालं.... आणि अलकाचा धूम थ्री पासून चेन्नई एक्सप्रेसपर्यंतचा हा प्लॅन पुरता फ्लॉप ठरला....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.