मुंबई : सर सलामत तो पगडी पचास ही जुनी म्हण आहे. मात्र आधुनिक जगात दुचाकीवरच्या प्रवासात सर सलामत ठेवण्यासाठी हेल्मेटची गरज असते. मात्र वाढत्या हेल्मेट चोरीमुळे दुचाकीस्वार पुरते हैराण झाले आहेत.
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं २००१पासून मुंबई शहरात सक्तीचं झालं आहे. मात्र रस्त्यावर पार्किंग करताना, हेल्मेट चोरी सर्रास होत आहे. घाईमध्ये हेल्मेट दुचाकीवरतीच ठेवण्याची दुचाकीस्वारांची चूक, हेल्मेट चोरांसाठी आयती संधी ठरते.
हेल्मेट चोरीमुळे महाग हेल्मेट खरेदी न करता रस्त्यावरती स्वस्तातलं हेल्मेट खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र सध्या हेल्मेटचाच तुटवडा आहे.
दरम्यान हेल्मेटची सक्ती चेन्नई हायकोर्टानं १ जुलैपासून सक्तीची केली आहे. त्यामुळे थेट मुंबईतून हेल्मेट खरेदी करून तामिळनाडूला पाठवली जात आहेत.
एकंदरीत खिशाला कात्री लावण्याऐवजी आपल्या हेल्मेटची काळजी घेणं हेच महत्त्वाचं आहे. कारण हेल्मेटमुळेच सुरक्षेची हमी मिळते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.