मुंबई : महावितरणने घरगुती आणि व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून वीजदरात दीड टक्के वाढ करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री उशीरा ही दरवाढ जाहीर करण्यात आली. वीज नियामक आयोगाकडे महावितरणाने सव्वादोन टक्के दरवाढीची परवानगी मागितली होती. मात्र आयोगाने दीड टक्के दरवाढीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातली वीजबिले आता नव्या दरानुसार आकारली जाणार आहेत.
ही वीज दरवाढ पुढील चार वर्षांचा बहुवार्षिक वीजदर निश्चित करताना 2016-17 या वर्षाकरिता दीड टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दरात वाढ होणार आहे.