www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालंलयं. पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामूहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. याबाबत गृहमंत्र्यांचे मौन दिसून येत आहे.
मुंबईत एका महिला न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडलीये. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओ जवळील शक्तीमील कंपाऊंडमध्ये या २२वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एका मासिकात फोटोग्राफर म्हणून काम करत आहे.
तिला ऑफिसने दिलेले फोटोशूट करण्यासाठी ही तरूणी सायंकाळी सहाच्या सुमारास शक्ती कंपाऊंडमध्ये गेली असता तिच्यावर ४ ते ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. सध्या तिच्यावर जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी पाच जणांवर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
या बलात्काराविषयी माहिती घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटली यांनी या बाबतीत बोलणं सोईस्कररित्या टाळलं. एका गंभीर गुन्हाची नोंद झाली आहे. तपास योग्य गतीने सुरू झाले आहे. स्वत: आयुक्त याबाबत स्टेटमेंट करतील, असं सांगून जबाबदारी आयुक्तांवर टाकली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.