मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचा प्रारंभ आज झाला. संविधान दिनाचे औचित्य साधत भाजप खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकारच्या NTC च्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या MMRDA ला काम सुरु करण्याची परवानगी दिली गेली.
हा कार्यक्रम इंदू मिलच्या जागेत पार पडला. MMRDA ने इंदू मिलमधील जुने बांधकाम तोडण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ति केली आहे. सुमारे चार महिन्यांच्या कालवधीत हे बांधकाम तोडले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या उभारणीला सुरुवात होईल.