आशियातल्या पहिल्या महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती

आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती करण्यात आलीय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 18, 2017, 08:09 PM IST
आशियातल्या पहिल्या महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती title=

मुंबई : आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती करण्यात आलीय. विद्यापीठातर्फे फोर्ट कॅम्पसमधल्या विद्यार्थीनींना फॉर्मल ड्रेस घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. 

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागानं यासंदर्भातलं परिपत्रक काढलंय.  फॉर्मल कपडे बंधनकारक केल्यानं विद्यार्थिनींना जीन्स, शॉर्ट, स्कर्टस, मिनीज आणि मिडीज घालता येणार नाहीत. 

या निर्णयाचं विद्यार्थिनी आणि पालकांनी स्वागत केल्याचा कुलगुरू शशिकला वंजारी यांचा दावा आहे. पण काही विद्यार्थिनींनी यावर नाराजी व्यक्त केलीय. 

एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेटमधल्या संकुलात विविध शाखांमध्ये सुमारे ५ हजार विद्यार्थिनी शिक्षण घेतात.