मुंबई विमानतळावर जुन्या नोटांची २५ कोटींची रोकड जप्त, व्यापाऱ्याला अटक

विमातळावर २५ कोटींच्या जुन्या नोटासह व्यापारी पारसमल लोढा याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली. 

Updated: Dec 22, 2016, 11:56 AM IST
मुंबई विमानतळावर जुन्या नोटांची २५ कोटींची रोकड जप्त, व्यापाऱ्याला अटक title=

मुंबई : विमातळावर २५ कोटींच्या जुन्या नोटासह व्यापारी पारसमल लोढा याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली. 

पारसमल लोढा यांने तब्बल 25 कोटी रकमेच्या जुना नोटा अनधिकृतपणे बदलून घेतल्याचा आरोप आहे. मुंबईत विमानतळावरुन पारसमल लोढा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. व्यापारी लोढा हा कोलकातामधील आहे.

नोटाबदली प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक शेखर रेड्डी आणि त्यांचा सहकारी रोहित टंडन यांची चौकशी केल्यानंतर पारसमल लोढा यांचं नाव समोर आले होते. रोहित टंडनच्या कार्यालयाची तपासणी केली असता सापडलेले 13 कोटी रुपये पारसमल लोढा यांचे असल्याचं आढळलं होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोढा याच्या मुलीचे राजेशाही थाटात लग्न झालं होते. या लग्नाला अनेक अधिकारी, राजकारणी आणि बॉलिवूड स्टार्सनी उपस्थित होते. त्यामुळे या लग्नाची चर्चा होती.