www.24taas.com, मुंबई
एक बिहारी सौ पर भारी या सिनेमाचे वितकर मराठी असल्यामुळं आणि त्यांची जुनी ओळख असल्यामुळं सिनेमाच्या वितरणासाठी मदत केल्याचं स्पष्टीकरण मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे. ज्यावेळी वितरणासाठी मदत केली त्यावेळी तो सिनेमा भोजपुरी असल्याचं माहित नव्हतं असंही नांदगावकर म्हणाले.
असा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिनेमाचं नाव बदललं असंही नांदगावकर यांनी सांगितलं. रझा अकादमीचे प्रमुख मौलाना मोईन यांच्यासोबतचा नांदगावकर यांचा फोटो दैनिक सामनामध्ये छापून आला होता.
त्यावर धार्मिक कार्यक्रमासाठी आपण त्याठिकाणी गेलो होतं असंही नांदगावकर म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी शिवेसना उपनेते यशवंत जाधव यांचा मौलाना मोईन यांच्यासोबतचा फोटो दाखवला.