'शेतकरी दादा' तुम्ही ही माहिती तलाठ्याला दिलीय का?

दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.

Updated: Apr 1, 2015, 02:00 PM IST
'शेतकरी दादा' तुम्ही ही माहिती तलाठ्याला दिलीय का? title=

मुंबई : दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.

ही माहिती तलाठ्याला द्या...
१) राष्ट्रीयीकृत बँकेत खातं नसेल तर जनधन योजनेत खातं उघडा.
२) बँकेत जाऊन मला जनधन योजनेत खात उघडायचं आहे असं सरळ सांगा
३) हे खातं निशुल्क उघडलं जातं.
४) या खात्याच्या पासबुकची झेरॉक्स (अकाऊंट नंबरसह) तलाठ्याकडे द्या. तलाठी नसल्यास कोतवालकडे द्या. याबाबतची माहिती नंतर तलाठ्याला द्या.
५) यानंतर तुमचं अकाऊंट सरकार दरबारी जोडलं जाईल, आणि कधीही तुम्हाला मदत मिळाली, तर ती थेट तुमच्या अकाऊंटवर येईल.

राष्ट्रीयीकृत बँकांची यादी
१) अलाहाबाद बँक
२) आंध्र बँक
३) बँक ऑफ बडोदा
४) बँक ऑफ इंडिया
५) बँक ऑफ महाराष्ट्र
६) कॅनरा बँक
७) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
८) कॉर्पोरेशन बँक
९) देना बँक
१०) इंडियन बँक
११) इंडियन ओव्हरसीज बँक
१२) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
१३) पंजाब अँड सिंध बॅंक
१४) पंजाब नॅशनल बँक
१५) सिंडिकेट बँक
१६) युको बँकेत
१७) युनियन बँक ऑफ इंडिया
१८) युनायटेड बँक ऑफ इंडिया
१९) विजया बँक

तसेच
स्टेट बँक आणि त्याच्या सहकारी बँका
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बॅंक ऑफ बिकानेर
स्टेट बँक ऑफ जयपूर 
स्टेट बँक ऑफ हैदराबाद
स्टेट बँक ऑफ म्हैसूर
स्टेट बँक ऑफ पतियाळा
स्टेट बॅंक ऑफ स्टेट बँक ऑफ

इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका
आयडीबीआय बँक
भारतीय महिला बँक
भारतीय पोस्ट बँक  (प्रस्तावित)
मुद्रा बँक  (प्रस्तावित)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.