अंधेरीत ८ मजली व्यावसायिक इमारतीला आग

अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका आठमजली इमारतीला आज सकाळी आग लागली. कनकिया या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. 

Updated: Mar 25, 2015, 12:52 PM IST
अंधेरीत ८ मजली व्यावसायिक इमारतीला आग title=

मुंबई: अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका आठमजली इमारतीला आज सकाळी आग लागली. कनकिया या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. 

अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय. सुदैवानं यात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

ही आग नेमकी कशामुळं लागली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. या इमारतीत टीव्ही चॅनेलचं ऑफिस आणि अनेक महत्वाची कार्यालयं आहेत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.