अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीनं विरोध केला आहे.

Updated: Nov 4, 2016, 05:46 PM IST
अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीचा विरोध  title=

मुंबई : अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीनं विरोध केला आहे. अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होऊ देणार नाही, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा समितीनं दिला आहे. शिवस्मारकाला आमचा विरोध नाही तर जागेला विरोध असल्याचंही समितीनं स्पष्ट केलं आहे.

मच्छीमारांना उद्धस्त करून शिवस्मारक उभारणार का, कोर्टामध्ये केस असताना शिवस्मारकाचं टेंडर कसं असा सवाल समितीच्या दामोदर तांडेल यांनी उपस्थित केला आहे. तसंच मच्छीमार महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करणार नाही, असंही तांडेल म्हणाले आहेत.

शिवस्मारकामुळे पर्यावरण आणि मासेमारीला धोका निर्माण होईल अशी कारणं देऊन राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. पण यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं हरित लवादाकडे दिलं होतं.