मुंबई : तुम्हाला वारंवार हॉटेलच्या जेवणांचा आस्वाद घ्यायची असेल, तर यापुढे तुम्हाला खिशाकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. कारण, हॉटेल्समध्ये डाळीपासून बनणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत.
डाळीच्या किंमती कमी होत नसल्यामुळे 'इंडियन हॉटेल्स असोसिएशन'नं हा निर्णय घेतलाय. दाल खिचडी, दाल फ्राय, थाळी, मेदू वडा, इडली, डोसा या पदार्थ्यांच्या किंमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार आहेत.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत जवळपास 4 हजार हॉटेल्समध्ये या किंमती वाढवण्याचा निर्णय आहार या हॉटेल मालकांच्या असोसिएशननं घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.