मुंबई : बिल्डरकडून घर घेतल्यानंतर ज्यांची फसवणूक झाली असेल आणि त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर 'मोफा' कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी लेखी आदेश दिले होते. त्यानुसार मोफाअंतर्गत बिल्डर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. लोढावर यांच्या विरोधात वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या गोठात कुचबुज सुरु असून राजकीय गोठात जोरदार चर्चा सुरु आहे.
याच महिन्यात पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी 'मोफा' अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे परीपत्रक काढले होते. लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना चाप बसण्याकरिता 'मोफा' कायदा तयार करण्यात आला आहे.