मुंबई : मुंबईत रिक्षा, टॅक्सीवाल्यांची नेहमीच मुजोरी समोर येते.अनेक ठिकाणी भाडे नाकारले जाते. यावरून अनेक वेळा वाद होत असतात.
घाटकोपरच्या डोंगराळ झोपडपट्टी विभागात रस्ते चांगले असूनही तिकडे रिक्षाचालक जात नाही.यावर उपाय म्हणून लोकसेवा सहकारी सेवा संस्था यांनी घाटकोपर स्टेशन ते भीमनगर ,कातोंडी पाडा या डोंगराळ भागातून मोफत टॅक्सी सेवा सुरू केली आहे.हि सेवा मोफत असणार आहे.
यात जेष्ठ नागरिक,दिव्यांग,महिला तसेच विद्यार्थ्यांची मोफत वाहतूक करणार आहे. सकाळीं 8 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 अशी आठ तास ही सेवा असणार आहे.यासाठी प्रायोगिक तत्वावर दोन व्हॅन तयार केल्या आहेत. या व्हॅन मधे प्रवासादरम्यान फोन, वायफाय, वर्तमान पत्र, पिण्याचे पाणी या सेवा देण्यात येत आहेत. यामुळे या विभागातील लोकांनी कौतुक केलं आहे.