मुंबई : आरबीआयच्या निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोर्चाला शिवसेनेनंही आपला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली.
एकतर महाराष्ट्र पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. येत्या काळात ही ठिणगी पडली तर ती पतसंस्थांच्या माध्यमातून पडेल. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हर्षद मेहता, केतन पारिख हे पतसंस्थेत नाही, तर राष्ट्रीयकृत बैंकांमध्ये निर्माण झालेत. त्यामुळे पतसंस्थाना दोष देऊ नये. पतसंस्था कोलमडून पडल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. तसंच पंतप्रधानांच्या सल्लागारांना झोडून काढलं पाहिजे. असंही ते म्हणाले.