मुंबई : डोंबिवलीमध्ये गावगुंडांनी एकाच कुटुंबातील 7 जणांना बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडलीये. कल्याण जवळच्या नवी गोविंदवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी उच्छाद मांडलाय.
चरस, गांजा यांच्या सेवनाबरोबर परिसरातील महिला आणि तरुणींची छेडछाड करण्याइतपत मजल या गुंडांची गेली होती. या विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सलाम शेख यांनी टिळकनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
सलाम शेख यांनी तक्रार केल्याचं कळताच या गुंडांनी शेख यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासोबत घरातील इतर सदस्यांनाही बेदम मारहाण केली. या घटनेनंतर अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात येतोय.
पाहा व्हिडिओ