फाटक्या, लिहिलेल्या नोटा तुमच्याकडे असतील तर...

नवीन वर्षात धक्कादायक बातमी पसरवली जात आहे. १ जानेवारी २०१४पासून काही मजकूर लिहिलेल्या नोटा आणि फाटकी नोट बॅंका स्वीकारणार नाही, असं म्हटलं जात आहे. मात्र, असं काही होणार नाही, असं रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 1, 2014, 12:02 PM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था, मुंबई
नवीन वर्षात धक्कादायक बातमी पसरवली जात आहे. १ जानेवारी २०१४पासून काही मजकूर लिहिलेल्या नोटा आणि फाटकी नोट बॅंका स्वीकारणार नाही, असं म्हटलं जात आहे. मात्र, असं काही होणार नाही, असं रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे.
स्क्रिबल्ड नोट्‌स नोटा स्वीकारणे बंद होणार असल्याची चर्चा बॅंकेने फेटाळून लावली आहे. ही अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र सर्वसामान्यांनी त्यावर विश्‍वास ठेवू नये आणि नोटांचा वापर करावा. नोटा लिहिलेल्या आणि फाटक्या नोटांबाबत रिझर्व्ह बॅंकेने अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना कोणालाही दिलेल्या नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने आज प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत पीटीआयला दिलेल्या वृत्तात तसे नमूद केले आहे.
नोटांवर काही लिहिणे हे रिझर्व्ह बॅंकेच्या `स्वच्छ नोटा` धोरणाविरुद्ध असून बॅंकांनी, संस्थांनी किंवा सर्वसामान्यांनी नोटांवर काही लिहू नये, असे आवाहनही रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. त्यामुळे फाटक्या नोटा घेणार नाही, असं त्याचा अर्थ होत नाही. बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी नोटांवर काही लिहू नये, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केली होती. अशा प्रकारे नोटा खराब केल्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते, असे निरीक्षणही बॅंकेने नोंदवले आहे. बॅंकेच्या धोरणानुसार बॅंकांकडे आलेल्या अशा प्रकारच्या नोटा पुन्हा ग्राहकांना दिल्या जात नाहीत, असे स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.