मुंबई : विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सनसनाटी गौप्यस्फोट केलाय... आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्र्यांनी प्रचंड घोटाळे केले. त्यांना 20 ते 22 टक्के कमिशन दिले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केलाय...
जलसंपदा खात्यातील टक्केवारीचा पर्दाफाशच महाजन यांनी केल्यानं एकच खळबळ उडालीय... येत्या आठवड्यात जलसंपदा खात्यातील आणखी अनेक घोटाळे उघड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची याआधीच एसीबीमार्फत चौकशी करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिलीय..
आता नवे घोटाळे उघड झाल्यास ते आणखी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जातेय...
गिरीश महाजनांची नार्को चाचणी करा – नवाब मलिक
तर दुसरीकडे ज्यांनी गिरीश महाजनांना ऑफर दिली त्यांची नावे उघड करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केलीय. महाजन त्यांची नावे उघड करत नसतील त्यांची नार्को चाचणी करा असा पलटवारही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.