मुंबई : प्रशासकिय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून परिक्षेसाठी मुंबईत आलेल्या सायली ढमढेरेला रेल्वे पकडण्याच्या नादात आपले पाय गमवावे लागलेत.
मुंबईमध्ये SIAC ची परिक्षा देण्यासाठी सायली पुण्याहून मुंबईत आली होती. परिक्षा देऊन परतत असताना कल्याण रेल्वे स्थानकावर इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना तोल गेला आणि ती रेल्वेखाली गेली. तीच्या सोबत असणा-या मैत्रिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सायली रेल्वेखाली आली. सायलीचा डावा पाय तुटला असून, तिचा दुसरा पायही कापावा लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च लागेल, तो करणं शक्य नसल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. सायलीला झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा रेल्वे फलाटाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येते आहे.