चालत्या रेल्वेत तरुणीवर अतिप्रसंग... पोलिसांनी खाली घातली मान!

बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला. प्रसंगावधान राखत पीडित मुलीनं मोठ्या कष्टाने आपली सुटका करून घेतली. यावेळी गाडीत मदतीसाठी एकही रेल्वे पोलीस नव्हता. या घटनेनंतर पीडित तरुणीने ‘झी २४ तास’शी संपर्क साधला.
पीडित तरुणी कुडाळला या रेल्वेत चढली होती. ती एकट्यानं प्रवास करत आहे, हे पाहून एका अज्ञात व्यक्तीनं अगोदर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला... आणि चक्क तिला अंमली पदार्थ ऑफर केले. यावेळी, प्रसंगावधान राखून या तरुणीनं आपल्या भावाशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानं पोलिसांना कळवल्यावर रत्नागिरी स्टेशनवर ‘आरपीएफ’नं तिच्याशी संपर्क साधला. मात्र, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी अगोदर तरुणीलाच पनवेलला जाऊन लेखी तक्रार नोंदविण्यास सांगितलं... त्या व्यक्तीला ताब्यात न घेता या अधिकाऱ्यांनी आरोपीलाही त्याच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली. संबंधित तरुणीनं यानंतर गाडीत उपस्थित असलेल्या ‘टीसी’लाही तक्रार केली पण, मदत तिथंही तिला निराशाच मिळाली. त्यानंतर या तरुणीनं थेट ‘झी २४ तास’कडे मदतीची याचना केली.
दरम्यान, ‘झी २४ तास’नं ही बातमी दाखवताच पोलिसांना जाग आलीय. ‘झी २४ तास’नं दिलेल्या दणक्यानंतर पोलिसांनी संबंधित तरणाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.

व्हिडिओ पाहा : 'झी २४ तास'चा दणका; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.