मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आलीय.
पालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 13 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय. पालिकेतल्या सर्वपक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यांनी केलीय.
अधिक वाचा - मुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार
तर कंत्राटी कामगारांना मागील वर्षाच्या वेतनावर 8.33 टक्के बोनस देण्यात येणार आहे. बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी म्हणजे 5 नोव्हेंबरला देण्यात येणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, या बोनसमुळे महापालिकेवर 169 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.