मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे.
गाडी क्रमांक ०१०९५ दादरहून १८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक रविवार, बुधवार आणि शुक्रवारला ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता सावंतवाडीला पोहणार आहे. ही गाडी ८ वाजून २५ मिनिटांनी दिव्याला येणार आहे. इतर थांबे नेहमी प्रमाणे असणार आहेत.
तसेच गाडी क्रमांक ०१०९६ सावंतवाडीहून १९ सप्टेंबरपर्यंत सोमवार, गुरूवार आणि शनिवारपासून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ४ वाजता दादरला पोहणार आहे. ही गाडी ३ वाजून १३ मिनिटांनी दिव्याला येणार आहे. इतर थांबे नेहमी प्रमाणे असणार आहेत.