मुंबई : शहरात 175 अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार आहे. आजपासून सात दिवसांच्या आत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्रासाठी अतिरिक्त सेविका (दुसरी कार्यकर्ती)ची एकूण 175 पदे तात्पुरत्या स्वरुपाची मानधन तत्वावर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), बांद्रा (प.), मुंबई या प्रकल्प कार्यक्षेत्रातील अतिरिक्त सेविका (दुसरी कार्यकर्ती) मानधन पदासाठी अंगणवाडी ज्या वॉर्डात कार्यरत आहे. त्याच वॉर्डातील स्थानिक रहिवासी असलेल्या शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. वय 21 ते 30 वर्षे असावे. सोबत वयाचा दाखला आवश्यक आहे. उमेदवारांने विहित नमुन्यातील अर्ज पाकिटात बंद करुन पाकिटावर शहराचे नाव, अंगणवाडी केंद्राचे नाव व पदाचे नाव याचा स्पष्ट उल्लेख असावा. बंद पाकिटातील अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, बांद्रा यांचे कार्यालय, बी.डी.डी.चाळ क्र. 117, वरळी, मुंबई -18 पाठवावा, असे कळविले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरात पाहा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.