मुंबई : गेल्या अनेक दशके बंद असलेले १५० मीटर लांबीचे ब्रिटिश कालीन बंकर महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोधून काढले आहे. मलबार हील येथील राजभवनात हे भुयार सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बंकरला आज भेट देण्याची शक्यता आहे.
या बंकरला राज्यपाल विद्यासागर राव यांनी पत्नी विनोधा यांच्यासह भेट दिली. तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी राहणाऱ्यांनी राज्यपालांना या बंकरविषयी सांगितले तेव्हा त्यांनी हे बंकर उघडण्याचे आदेश दिले.
१२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बंकराच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर बांधलेली भिंत तोडली. त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला
.
आत भुयारात एकूण वेगवेगळ्या आकाराच्या १३ रूम सापडल्या. हे बंकर २० फूट उंच आहेत. त्याचे आणखी एक द्वार पश्चिमेला आहे. खूप मोठा पॅसेज असून छोट्या छोट्या रुम्सही सापडल्या आहेत.
हे बंकर सुमारे ५००० स्केअर फूटांचे आहे. याचा वापर दारूगोळा, काडतुसे, इतर युद्ध साहित्य ठेवण्यासाठी केला जायचा, तसेच वर्कशॉप म्हणून याचा उपयोग व्हायचा.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे बंकर बंद करण्यात आले. तरही हे बंकर आश्चर्यकारकरित्या सुस्थितीत आहे. या संपूर्ण बंकरला ड्रेनेज सिस्टिम आहे. तसेच शुद्ध हवा खेळती राहावी याचीही व्यवस्था आहे.
राजभवनाचा इतिहास पाहिला तर याला गर्व्हमेंट हाऊस म्हटले जायचे. ब्रिटीश सरकारचे रहिवासाचे १८८५ पासून हे ठिकाण आहे. लॉर्ड रे यांनी आपले १८८५ पासून आपले कायमचे राहण्याचे ठिकाण केले.
१८८५ पूर्वी मलबार हिल हे ब्रिटिश गव्हर्नरांचे उन्हाळ्याचे वास्तव्याचे ठिकाण होते.