गोविंदा पथकांची 'पुरस्कार वापसी'

सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवातल्या गोविंदांच्या थरावर निर्बंध आणल्यानं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच भाग म्हणुन गोविंदा पथकांनी पुरस्कार वापसीचा पवित्रा घेतला आहे. 

Updated: Aug 23, 2016, 09:28 AM IST
गोविंदा पथकांची 'पुरस्कार वापसी' title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवातल्या गोविंदांच्या थरावर निर्बंध आणल्यानं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच भाग म्हणुन गोविंदा पथकांनी पुरस्कार वापसीचा पवित्रा घेतला आहे. 

सर्वाधिक थर लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःची नोंद करून घेणारं, मुंबईतल्या जोगेश्वरीमधलं जय जवान गोविंदा पथक हे त्यापैकीच एक. दहीहंडीतल्या निर्बंधांबाबत राष्ट्रपतींनी लक्ष घालण्याची मागणी जय जवान गोविंदा पथकानं केलं आहे. अन्यथा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे हा जागतिक रेकॉर्डचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय, जय जवान गोविंदा पथकानं घेतला आहे.

राष्ट्रपतींना आपला पुरस्कार सोपवण्यासाठी त्यांची वेळही मागून घेणार असल्याचं या गोविंदा मंडळाकडून सांगण्यात आलंय. १० ऑगस्ट २०१२ मध्ये दहिहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकानं, नऊ थरांची मानवी मनोरा उभारुन विश्वविक्रम रचला होता.