मुंबई : तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय लालफितीच्या सरकारी कारभारात काही केल्या जात नाही.
आघाडीचं सरकार जाऊन, भाजप-शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं. मात्र सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक पडलेला नाही.
३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस... यंदा यादिवशी विविध सरकारी खात्यांनी सुमारे ११५ शासन निर्णय (जीआर) जाहीर केले.
खात्यांना विविध योजनांसाठी दिलेला निधी अखर्चित राहून, पुन्हा सरकार जमा होऊ नये, यासाठी अगदी शेवटच्या दिवशी जीआर काढण्याची ही लगीनघाई यंदाही सुरूच राहिली.
यापूर्वी अशा प्रकारांवर विरोधी पक्षात असलेल्या भाजप-सेनेचे आमदार टीका करायचे. मात्र, तेच आता सरकारमध्ये असले तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.