www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरील सेवा १० ते १५ मिनिटांनी नेहमीच उशीरा असते. त्यामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच अचानक गाड्या रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
हार्बरवरील प्रवाशांना पुन्हा अडचणीचा सामना करावा लागला. मंगळवारी तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांच्या अडचणीत भर पडली. ओव्हरहेड वायर तुटल्याने चेंबूर ते सीएसटी लोकलसेवा ठप्प झाली होती.
ओव्हरहेड वायर तुटल्याचे वृत्त मिळताच दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र पावसाची संतत धार सुरु असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.