मुंबई : प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या केली आहे. अकरा वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांनंतर लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याच्या रागातून प्रियकराला होता. यावरून भररस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची घटना काळाचौकी येथे रविवारी घडली.
प्रसाद सावंत असे आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे, प्रसाद सावंत २७ तर एकता तळवलकर ही २५ वर्षांची होती.
लालबाग परिसरातील देनू कंपाऊंड येथे सावंत राहत होता. तो इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. त्याच परिसरात राहणारी एकता तळवलकर सोबत गेल्या अकरा वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध होते.
या प्रेमसंबंधाला एकताच्या घरच्यांनी नकार दिला होता. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यासाठी सावंत एकताला जबरदस्ती करत होता.
रविवारी दारुच्या नशेत सावंतने एकताला काळाचौकी येथील जीडी आंबेडकर रोडकडे बोलावून घेतले. तेथे लग्नावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. याच रागातून सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास सावंतने भररस्त्यात सोबत आणलेल्या चाकूने एकताच्या गळ्यावर वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एकताला तेथेच सोडून सावंत काळाचौकी पोलीस ठाण्यात हजर झाला.
सावंतकडून एकताच्या हत्येची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. एकताला जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच एकताचा मृत्यू झाला, तिला डॉक्टरांनी मृच घोषित केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.