अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर अज्ञातांनी चाकूहल्ला करुन त्याची हत्या केली. अंबरनाथमधील राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे. मागील 15 वर्षांत तब्बल 6 नगरसेवकांची हत्या झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या 4, भाजप 1 आणि रिपाइंच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.
पहिली हत्या : 1999 :वसंत पांढरे (भाजप)
दुसरी हत्या : 2001 प्रसन्न कुलकर्णी (शिवसेना)
तिसरी हत्या : 2002 नरेश गायकवाड (रिपाइं)
चौथी हत्या : 2008 : संतोष पवार (शिवसेना)
पाचवी हत्या : 2011 : नितीन वारंगे (शिवसेना)
सहावी हत्या : 2015 : रमेश गुंजाळ (शिवसेना)
अंबरनाथमध्ये 1999 पासून नगरसेवकांच्या हत्यांचं सत्र सुरु झालं. भाजपचे नगरसेवक वसंत पांढरे यांची 1999 मध्ये, शिवसेनेचे नगरसेवक प्रसन्न कुलकर्णी यांची 2001 मध्ये राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती.
2002 मध्येच रिपाइंचे नगरसेवक नरेश गायकवाड यांची त्यांच्याच कार्यालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तर 2008 साली शिवसेनेचे नगरसेवक संतोष पवार यांची जमिनीच्या वादातून हत्या झाली. 2011 साली शिवसेनेच्याच नितीन वारंगे यांची त्यांच्याच कन्स्ट्रक्शन साईटनवर गोळ्या झाडून हत्या केली होती.
शहरात वाढत्या हत्या सत्रांमुळे अंबरनाथची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून झाली आहे. शुक्रवारी रमेश गुंजाळ यांच्या हत्येनंतर अंबरनाथमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.