मुंबई : हिट अँड रन प्रकरणी सिने अभिनेता सलमान खानचे भवितव्य या आठवड्यात ठरणार आहे. हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आजपासून सलमान खानच्या अपिलावर निकाल सुनावण्यास सुरूवात झालीय.
अपघातच्या रात्री नेमकं काय झालं हे सध्या न्यायमूर्ती वाचून दाखवत आहेत. गेल्या शुक्रवारी सलमान खानचे वकील अमित देसाई यांनी आपला अंतिम युक्तीवाद संपवला होता.
तर "मद्यधुंद अवस्थेत आपल्या गाड़ीखाली एकाला चिरडून ठार मारल्याप्रकरणी सिने अभिनेता सलमान खान याला कोणतीही सहानुभूती न दाखवता मुंबई सत्र न्यायालयाने त्याला दिलेली पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवण्याची विनंती करत सरकारी वकीलांनी आपला अंतिम युक्तीवाद संपवला होता. त्यावर दोन्ही पक्षाचे युक्तीवाद संपल्याने आजपासून अपीलावर निकाल सुनावण्यास सुरुवात करु असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.