मीच शिवसेनेचे मंत्री, आमदारांना रोखणार - नारायण राणे

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेते नारायण राणे अधिक आक्रमक झाले आहेत. वांद्रे मतदार संघात शिवसेनेचे मंत्री, आमदार फिरत असताना त्यांच्यावर कारवाई नाही. आता मीच त्यांना रोखणार, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.

Updated: Apr 11, 2015, 01:16 PM IST
मीच शिवसेनेचे मंत्री, आमदारांना रोखणार - नारायण राणे title=

मुंबई : माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेते नारायण राणे अधिक आक्रमक झाले आहेत. वांद्रे मतदार संघात शिवसेनेचे मंत्री, आमदार फिरत असताना त्यांच्यावर कारवाई नाही. आता मीच त्यांना रोखणार, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.

शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नीलेशला पोलीस यानी ताब्यात घेतले आहे. ही सरकारची दादागिरी आहे. शिवसेनेचे मंत्री आणि कार्यकरते फिरत असताना त्यांना का रोखत नाहीत. आता मी स्वत: त्याना रोखणार. पोलिसांना काय करायचे ते करू द्या,  शिवसेनेने सत्तेचा दुरूपयोग केला आहे. मी पोलीस आयुक्तांना फोनवर बोललो आहे, असे राणे यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान,  राणे कांगावा करत आहेत. ती त्यांची जुनी सवय आहे. त्यांचा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज नाही.  शिवसेना सत्तेच्या दुरूपयोग करत नाही. निवडणूक आयोग निपक्षपाती काम करत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रचाराची मुदत संपल्यनंतर मतदार नसलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मतदार संघ सोडून जाणे अपेक्षित असते. मात्र, असे न करता राणे पुत्र दोघेही वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात फिरताना आढळले म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. 

नितेश राणेला वाकोला पोलिसांनी तर नीलेश यांना खेरवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले होते. त्यांना तासाभरा पूर्वीच सोडले पोलिसांनी सोडले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.