www.24taas.com, मुंबई
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी डॉन अरुण गवळी यांना फाशी होणार की जन्मठेप यावर अंदाज व्यक्त केले जात असताना खुद्द गवळी मात्र हा आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आहे.
कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. मी तुरुंगातच रहावं, अशी काही जणांची इच्छा असल्याने माझ्यावर हे खोटे आरोप करण्यात आले आहेत, या शब्दांत गवळीने मंगळवारी मोक्का न्यायालयासमोर आपली बाजू मांडली.
न्यायालयाने शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. शिक्षेवरील निर्णय 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोक्का न्यायालयाने राखून ठेवला आहे. अरुण गवळी याने तब्बल 4 वर्षांपूर्वी बाळा सुर्वे व साहेबराव भिंताडे यांच्याकडून खूनाची सुपारी घेतली होती. या लोकांनी अरुण गवळीला 30 लाख रुपये दिले होते, असं सांगण्यात येतंय.