मुंबई : महाराष्ट्रातील दोन बड्या देवस्थानांतील गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश सुनिश्चित केल्यानंतर आता तृप्ती देसाईनं आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवलाय.
शनि शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात आता महिलांना प्रवेश मिळालाय. यानंतर, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आज हाजी अली दर्ग्यात जाऊन चादर चढवणार आहेत.
मात्र, असा काही प्रयत्न केल्यास 'चप्पलने मारू...' अशी धमकी शिवसेना नेते हाजी अराफात यांनी दिलीय. त्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय.
'तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटनेला आम्ही दर्ग्यात प्रवेश करू देणार नाही. हाजीअलीमध्ये जाऊन मजारला हात लावण्याची भाषा त्या करत आहेत... याची आम्ही घोर निंदा करत आहोत. आम्ही असं होऊ देणार नाही'.... असं त्यांनी म्हटलंय. दर्ग्यात प्रवेश करणाऱ्या महिलांना चप्पलने मारण्यात येईल अशी धमकीच त्यांनी दिलीय.